ही कविता दिवाळी या प्रकाशाच्या, आनंदाच्या आणि एकतेच्या सणाचं सुंदर वर्णन करते.
ती दिव्यांच्या उजेडात झळकणाऱ्या घरांचा, आनंदाने भरलेल्या वातावरणाचा आणि प्रेमाच्या सुगंधाचा उत्सव साजरा करते.
या ओळींमधून कवी आपल्याला आठवण करून देतो की खरी दिवाळी फक्त बाहेर दिवे लावण्यात नाही, तर आपल्या मनात प्रकाश पेरण्यात आहे. ✨🌼
“आली दिवाळी, घेऊन भरपूर आठवणी,
चला लुटूया आनंद आपल्या सुट्टीचा,
करूया साजरी सुखसमृद्धीची आणि आनंदाची भरभराटीची दिवाळी!” 🪔✨“करूया उत्साहाने साजरी आपल्याघरी,
भेटूया आपल्या मित्रमंडळींना आणि सगळ्या सोबत्यांना,
देऊ आनंदाची मिठी, करूया तोंड गोड फराळाने,
आणि घेऊया दर्शन देवी-देवतांचे!”“करूया साजरा सण वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत,
करूया आदर-सन्मान आईवडिलांचा, पूर्वजांचा आणि सर्व कुटुंबियांचा,
पुसूया दुःखाचे अश्रू, आणि करूया तोंड गोड —“अशा या सर्वांना सुख-समृद्धी आणि आनंद देणाऱ्या दिवाळीला,
करूया साजरी उत्साहात दीपावलीचा सोहळा!
आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा —
सचिन रामचंद्र पाटील आणि परिवाराकडून!” 🪔💐
